पुणे महापालिकेच्या नगर सचिवपदी योगिता भोसले
पुणे: पुणे महापालिकेच्या नगर सचिवपदी योगिता भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला.
योगिता भोसले या यापूर्वी प्रभारी नगर सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. आता त्यांना पदोन्नती देत पूर्णकालिक नगर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेतील सर्व विषय सभांचे आणि मुख्य सभांचे प्रशासकीय कामकाज नगर सचिव विभागामार्फत केले जाते.
२०२० पासून नगर सचिवपद रिक्त होते, त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०२३ साली प्रभारी नगर सचिव शिवाजी दौंडकर यांच्या निवृत्तीनंतर राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविण्यात आला होता. आता त्यांना या पदावर अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले आहे.