सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ हिला पोलीस कोठडी
सतीश वाघ हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ हिनेच पतीच्या कुणाचा कट रचल्याचे तपासात समोर आले होते. बुधवारी मोहिनी वाघ हिला पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी मोहिनी हिला 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
अनैतिक संबंधासह पतीचे संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच हाती असावे या उद्देशाने पत्नी मोहिनी वाघ हिने सतीश वाघ यांची हत्या घडवून आणली. त्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली. या गोष्टी तपासात समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणात पत्नीच सूत्रधार असून आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने आपल्या पतीचा काटा काढल्याचे समोर आले होते. त्यानंतर अधिक तपासासाठी मोहिनी वाघ हिच्यासह आधी अटक केलेल्या चारही जणांना पोलीस कोठडी सुनावली आली.
सतीश वाघ हत्या प्रकरणात यापूर्वी पवन शामसुंदर शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास उर्फ विक्की सीताराम शिंदे आणि अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर यांना अटक केली आहे.
सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला होता.