मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?
फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रीकेट बेटींग च्या गुन्ह्यातअटक केली होती. क्रिकेट बेटिंग मधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते.या टोळीने काँलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंग मध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून viral झालेल्या व्हीडीओ मुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.