काय सांगता ! नववर्षाच्या पार्टीच्या निमंत्रणासोबत पबवाल्यांनी दिले चक्क ‘कंडोम’

शिक्षणाचे माहेरघर महणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पब कल्चर फोफावले आहे. एका बाजूला पोलिस,महापालिका अनधिकृत पब्सवर कारवाई करत असतानाही रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत पब्स सुरू राहताना दिसत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका पबने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीच्या निमंत्रणात चक्क कंडोम दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील पब कल्चरने आता हद्दच केली आहे. या पबने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले आहे. त्यासाठी पाठवलेल्या निमंत्रणात चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीट पाठवले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. जैन यांनी या सगळ्या प्रकाराबाबत एक तक्रार अर्ज दिला आहे.

तक्रार अर्जात जैन यांनी म्हटले आहे की, “पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्राल ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे.”

दरम्यान, या विचित्र नियमंत्रणाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

rushi