विक्रांत मेस्सीने घेतला बॉलीवूडमधून संन्यास!
लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सीने बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी विक्रांत बॉलिवूडमधून निवृत्ती घेणार असल्याची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. विक्रांतला ’12th Fail’ या सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तो यशाच्या शिखरावर होता. मात्र अचानक त्याने चित्रपटसृष्टीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. समाजमाध्यमावर त्याने ही माहिती दिली.
सोमवारी पहाटे विक्रांतने समाजमाध्यमावर आपला आपला निर्णयाची घोषणा केली. लिहिलेल्या पोस्ट मध्ये विक्रांत म्हणाला, “मागील काही वर्षे विलक्षण होती. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. परंतु आता मी आयुष्यात पुढे जातोय. एक पती, वडील आणि मुलगा आणि एक अभिनेता म्हणून ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. ही वेळ घरी परतण्याची आहे. २०२५ या वर्षी आपण एकमेकांना शेवटचे एकदा भेटूया. जोवर योग्य वेळ येत नाही. शेवटचे दोन सिनेमे आणि खूप वर्षांच्या आठवणी. पुन्हा एकदा धन्यवाद. मी कायम तुमचा ऋणी असेन.”
२०२५ मध्ये विक्रांतचे ‘यार जिगरी’ आणि ‘आँखो की गुस्ताखियाँ’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर विक्रांत बॉलिवूडमधून निवृत्ती घेईल. सध्या विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमा चांगलाच गाजतोय. परंतु या सिनेमाच्या दरम्यान विक्रांत आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळेचा विक्रांतने हा निर्णय घेतला का? अशी चर्चा सिनेविश्वात होताना दिसतेय.