प्रचाराकरीता वापरण्यात येणाऱ्या वाहनांना परवानगी आवश्यक

पुणे : दौंड विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचाराकरीता वापरण्यात येणाऱ्या वाहनांना बारामती उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेणे बंधनकारक आहे, त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी विनापरवानगी वाहनांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे.

दौंड तहसील येथील विधानसभा मतदारसंघ कार्यालयात एक खिडकी कक्ष असून या कक्षामार्फत सभा, पदयात्रा, ध्वनिक्षेपन आणि वाहन परवान्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. या कक्षामध्ये सभा आणि वाहन परवान्यासाठी आतापर्यंत 54 अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) आतापर्यंत 46 वाहनांना प्रचारकरीता परवानगी दिली आहे.

यासोबतच वाहनांमध्ये अतिरिक्त ध्वनिक्षेपन (लाउडस्पीकर) बसवण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे कामही परवानगीशिवाय करता येणार नाही. वाहन कोणत्या उमेदवाराच्या प्रचारात वापरले जात आहे तसेच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या परवाना पत्राची मूळप्रत त्या वाहनाच्या पुढच्या काचेला चिकटवणे अनिवार्य आहे.

प्रचारमोहीमेत विनापरवाना वाहन वापरल्यास संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल. प्रचाराकरीता सुरक्षितेतच्यादृष्टीने आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने वाहन वापरण्याबाबत नियमावली तयार केली असून त्यांचे तंतोतत पालन करावे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना प्रचाराकरीता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची रितसर परवानगी घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अरुण शेलार यांनी आवाहन केले आहे

Leave a Reply

rushi