वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन, पती-पत्नीच्या नावावर करोडोंचा फ्लॅट, ‘या’ कारणामुळे होवू शकते कारवाई

वाल्मिक कराडचे पिंपरी-चिंचवडसोबत असलेलं कनेक्शन समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड परीसरातील पार्क स्टेट इथं त्याचा कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट असल्याचं उघडकीस आलं आहे.

वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावरील ६०१ नंबरचा फ्लॅट आहे. या फ्लॅटवर एक लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.

थकबाकी न भरल्यास महापालिका कोणती कारवाई करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून वाल्मिक कराडवर मंगळवारी ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर परळीमधील वातावरण तापले आहे. कराड समर्थकांनी परळी बंदची देखील हाक दिली होती. दरम्यान, परळी पोलीस ठाण्याबाहेर कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे.

Leave a Reply

rushi