नववर्षाचा आंनद काळाने घेतला हिरावून; बंदोबस्त संपवून घरी परतणांऱ्य़ा PSIचा अपघाती मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस दलातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावर असलेल्या PSI चा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकीकडे नवर्षाचा जल्लोष सुरु होता तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील पोलिस उपनिरीक्षकाचा कर्तव्य बजावून घरी परताना अपघाती मृत्यू झाला. हा घटनेनंतर पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जितेंद्र गिरनार असे अपघातात मृत्यू झालेल्या PSI यांचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे पूर्वी वाकड पोलीस स्टेशनला होते. तेथून त्यांची बदली महाळुंगे पोलीस स्टेशनला झाली. रात्रपाळी करून घरी परत निघालेल्या गिरनार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस उपनिरीक्षक गिरनार हे नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता, मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली. या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गिरनार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

rushi