पुण्यात पोलिसांचे कपडे घालून चोरी; ‘ या ‘ भागात ८ दिवसात ४ चोऱ्या
पोलिसांचे कपडे घालून सोन्याच्या दुकानात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात हा प्रकार वारजे आणि सिंहगड रोड परिसरात घडला. पुणे पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पोलीस असल्याचे भासवून सोन्याच्या दुकानांमध्ये चोरी करत होता. आठ दिवसात त्याने चार दुकानांमध्ये चोरी केली. या तोतयाने पोलिसांची टोपी, पॅन्ट आणि पोलीस आय कार्ड जवळ बाळगले होते. या देशात तो दुकानांमध्ये जायचा आणि सोन्याची चेन आणि अंगठ्या बघण्याचा बहाणा करून त्या मोठ्या चालाखीने खोट्या दागिन्यांसोबत बदलायचा. खरे दागिने घेऊन तिथून निघून जायचं. अशाप्रकारे त्याने चार दुकानांमध्ये चोरी केली.
चार दुकानांपैकी एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे सोन्याचे दुकानदार तथा व्यापारी देखील सावध झाले आहेत. कोणत्याही प्रकारचे व्यवहार करताना सजगता बाळगण्याचे आवाहन दुकानदारांना करण्यात आले आहे. तसेच कुठलाही संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्यात यावे अशी सूचना देण्यात आली आहे.