तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ताः पुणे विमानतळ परिसरातून अज्ञातांनी अपहरण केल्याचा संशय
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे विमानतळावरून त्याचा संपर्क तुटल्याची माहिती असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरात संध्याकाळी ५ च्या सुमारास एका स्विफ्ट कारमधून काही अज्ञात व्यक्ती आल्या आणि त्यांनी सावंत यांच्या मुलाला गाडीत जबरदस्ती बसवून नेले. यामुळे हा अपहरणाचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.