राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची स्वारगेट बसस्थानकाला भेट

पुणे दि. 1 : परिवहन व नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे स्वारगेट येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी आढावा बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.

भविष्यात श्रीमती म्हणाल्या, भविष्यात अशा गंभीर घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दक्षता वाढवण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती तसेच जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

महिलांना निर्भयपणे प्रवास करता यावा, त्यांना सुरक्षिततेची हमी मिळावी व सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक लाभ घेता घ्यावा, यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे असेही श्रीमती मिसाळ म्हणाल्या.

या आढावा बैठकीस राज्य परिवहन नियंत्रण समितीचे प्रादेशिक व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळाचे व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

rushi