आंबेगाव मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ संपन्न

पुणे : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक पीगे लिगु यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रक्रियेवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, नायब तहसीलदार सचिन मुंढे, ईव्हीएम नोडल अधिकारी शांताराम किरवे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रक्रियेचे तांत्रिक कामकाज देशभूषण चौगुले आणि सुवर्णा मोरडे यांनी पाहिले.

यावेळी शिंदे यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले, मतदान केंद्रावर पाठविले जाणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सरमिसळ प्रक्रियेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आली असून प्रत्यक्ष मतदानाच्या आधी ही सर्व मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. एकूण ४१५ बॅलेट युनिट ४१५ कंट्रोल युनिट आणि ४५० व्हीव्हीपॅट यांची यावेळी सरमिसळ करण्यात आली. ३४६ बॅलेट युनिट, ३४६ कंट्रोल युनिट आणि ३४६ व्हीव्हीपॅट हे मतदान केंद्रासाठी वापरले जातील. उर्वरित ६९ बॅलेट युनिट ६९ कंट्रोल युनिट व १०४ व्हीव्हीपॅट राखीव ठेवले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

rushi