संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांची मोठी कारवाई, फरार आरोपींना ठोकल्या बेड्या, पुण्यातून घेतले ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार असलेल्या तीन आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. तथापि तिसरा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे.

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर बीडसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केली होते. तसेच पोलीस प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. तथापि पोलिसांनी आठवडाभरातच दोन फरार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र अजूनही तिसरा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.

काही दिवसांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड समजला जाणारा वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. कराड याची चौकशी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड याने चौकशी दरम्यान दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी पुण्यात छापेमारी करत घुले आणि सांगळे या दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मौन मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

लवकरच पोलीस अधीक्षक या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराड सोबतच इतरही आरोपींचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे ते लवकरच समोर येईल.

Leave a Reply

rushi