पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी, २३ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. तळजाई टाकी येथील मुख्य जलवाहिनी व मुख्य व्हॉल्व्हच्या अत्यावश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर तसेच शहरातील विविध पेठांमध्ये पाणीपुरवठा बाधित होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. पुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणी जपून वापरावे असं आवाहन करण्यात आलं आहे.