Pune : पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील समर्थ वाहतूक विभागांतर्गत १५ ऑगस्ट चौक ते टुरिस्ट हॉटेल चौकादरम्यानच्या रस्त्यावर २०० मीटर दोन्ही बाजूस ‘पी-१, पी-२ पार्किंग झोन’ करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबतच्या या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस जवळ, बंगला क्रमांक ६, विमानतळ मार्ग, पुणे यांच्या कार्यालयात १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

rushi