पुणे पोर्शे अपघात पंचनामा भाग-2 : “मी सर्व मँनेज करतो” म्हणत राजकीय नेत्याने ‘त्या’ कँफेमधे रचला गुन्ह्याचा कट
“मी सर्व मँनेज करतो” असे सांगत राजकीय नेत्याने इराणी कँफेमधे गुन्ह्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे 10.30 च्या सुमारास अश्पाक मकानदार, विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, अमर गायकवाड आणि अजून दोघे ससून हाँस्पीटल मधे पोचले. डॉ. तावरे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मदत करणार असल्याचे नेत्याने सांगितले होते त्यामुळे, अश्पाकने हाँस्पीटल मधे पोचल्यावर पहिला काँल नेत्याला केला. नेत्याच्या सांगण्यावरून अश्पाक ने डॉ. हाळनोरला गाठले आणि आरोपींएवजी त्यांच्यासोबत आलेल्या लोकांचे रक्त घेण्याबाबत सांगितले. हाळनोर ने नकार दिला, त्यावेळी पुन्हा त्या राजकीय नेत्याने डॉ. तावरेला फोन केला. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता, आणि सिसीटीव्ही मधे रेकॉर्ड ही झाला. या दोन तासात राजकीय नेत्याने डॉ. तावरेला वीसपेक्षा जास्त फोनकाँल्स केले. डॉ. हळनोर ने आरोपींच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यास नकार दिला त्यावेळी डॉ. तावरेने देखील हळनोरला वारंवार फोन करुन अश्पाक म्हणेल तसंच कर असे सांगितले. दरम्यान अश्पाक डॉ. हळनोरच्या केबिनमध्ये गेला आणि संबंधीत राजकीय नेत्याला बोलायचे आहे, असे सांगितले. राजकीय दबाव आणि पैशाचा वापर करून ससूनमधील डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यात आले. इतकेच नव्हे तर पुर्वी घेतलेले रक्ताचे नमुने कचराकुंडीत फेकून द्या असही डॉक्टरांना सांगण्यात आलं. रक्तबदलीचे ‘मिशन’ फत्ते झाल्याचे अश्पाक ने राजकीय नेत्याला कळविले. दुसरीकडे अल्पवयीन बाल न्यायालयात अल्पवयीन मुलाला हजर करण्यात आले.होते. निबंध लिहीण्याच्या अटीवर त्याचा जामीन देखील झाला.
याच बालन्यायालयाच्या आवारात रक्तबदलीसाठी ठरलेल्या चार लाख रुपयांचा व्यवहार पूर्ण करण्यात आला. अश्पाक आणि अमरने विशाल अगरवालच्या ड्रायव्हर कडून पैशाचे पाकीट घेऊन ससून हाँस्पीटलचा कर्मचारी अतुल घाटकांबळेला दिले. गुन्हा दाखल झाला, रक्ताचे नमुने बदलले, आरोपीला जामीनही झाला… आता प्रकरण मिटले, असे त्या राजकीय नेत्यासह विशाल आणि शिवानी अगरवालला देखील वाटत होते. परंतु, अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज मिडिया मध्ये व्हायरल झाले. जामीनाच्या अटींवर समाजध्यमातून टिकेची झोड उठली आणि पोलिसांनी पुन्हा तपासाला सुरुवात केली. ससून हॉस्पिटल मधील सिसीटीव्ही फुटेज बघून पोलीसही चक्रावून गेले. पोर्शे प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आणि या सगळ्या कटाचा सूत्रधार होता तो राजकीय नेता. अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, सुरेंद्र अगरवाल, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, घाटकांबळे या सगळ्यांना अटक झाली. रक्ताचे नमुने देणाऱ्या नातेवाईकांनाही गजाआड केले. दरम्यान त्या राजकीय नेत्याचीही चौकशी झाली. त्याने पोलीस चौकशी मधे काय उत्तरे दिली?डॉक्टर तसेच त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी काय कबुली दिली ? सिसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या काँल डिटेल्समुळे काय पुरावे पोलीसांच्या हाती लागले?
वाचा पोर्शे पंचनामा : भाग – २