पुणे : सिंहगड परिसरात राहणाऱ्या तरुणीचा जीबीएस सिंड्रोमने मृत्यू

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका युवतीचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मंगळवारी (ता. 18) मृत्यू झाला आहे. पुण्यातील सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती. किरण राजेंद्र देशमुख असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 27 जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिचा प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

Leave a Reply

rushi