कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एकजण अटकेत

पुणे: कल्याणीनगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालविल्या जात असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत एकाला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव भोई (वय २६, रा. वाघोली) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गौरी झोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिसांना कल्याणीनगरमधील “द स्पा व्हिला” या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून छापा टाकला. या कारवाईदरम्यान महिलांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान भोई याने महिलांना आर्थिक प्रलोभन दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले.

भोई याच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर करत आहेत.

Leave a Reply

rushi