एनआयबीएम रस्त्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मॅनेजरसह मालक अटकेत

पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने (AHTU Pune) एनआयबीएम रोडवरील आयरिन स्पा सेंटरवर छापा मारून मॅनेजर आणि मालकाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजता करण्यात आली.

या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्पा सेंटरचा मॅनेजर शिव राजेश भोसले (वय २१, रा. सैनिक विहार, एनआयबीएम पोस्ट ऑफिस रोड) आणि स्पा मालक निखील राजेंद्र नाईक (वय २६, रा. ग्रीन पार्क सोसायटी, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रस्त्यावरील आयरिन स्पा सेंटरमध्ये पिडीत मुलींना वेश्या व्यवसायासाठी मिळवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. पोलिसांनी यासाठी एक बनावट ग्राहक पाठवला. त्याने तपास करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आयरिन स्पावर छापा टाकला. इथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मॅनेजर आणि स्पा मालकाला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ७६ हजार रुपयांचे तीन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

Leave a Reply

rushi