ज्येष्ठ चित्रकार आणि ‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन
पुणे: ज्येष्ठ चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे जन्म झालेल्या गुरव यांनी निसर्गचित्रांमधून वेगळी ओळख निर्माण केली. धनगर संकल्पनेवर आधारित त्यांची चित्रे विशेष प्रसिद्धीस आली. दिल्लीतील […]