लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारले, जुनी सांगवी येथील भयंकर घटना

लिफ्टमधून जात असताना एकाने एका शिक्षिकेच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी केले तसेच तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना जुनी सांगवी येथे घडली. या शिक्षिकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी शिक्षिका खासगी शिकवणी घेतात. विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचे काम देखील करतात. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास, शिक्षिका पांलाडे निवास […]

1 min read

लोहगाव विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

पुणे : लोहगाव विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव पुढील कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर विमानतळाचे नाव बदलले जाईल. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे ठेवण्याची मागणी […]

1 min read

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवार यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, […]

1 min read

‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच; उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत कडाडले

मुंबई : कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई […]

1 min read

ताम्हिणी घाटात खाजगी बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू, २७ जखमी

रायगड: माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर भीषण बस अपघात झाला. पर्पल(Purple) ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक MH14GU3405) पलटी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला असून २७ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ९.३० ते ९.५० दरम्यान घडली. लोहगाव, पुणे येथील जाधव कुटुंबीय […]

1 min read

पीएमपी बसमध्ये मद्यपीने काढली महिलेची छेड, रणरागिनीने कॉलर धरली अन् धू-धू धुतला

पुणे: राज्यात अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पुण्यात घडलेल्या एका घटनेने महिलांनी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, हे सिद्ध केले आहे. एका मद्यपी व्यक्तीने बसमध्ये एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेने त्या मद्यपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना १८ डिसेंबर रोजी घडली. […]

1 min read

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

पुणे : हवेली तालुक्यातील मोजे पेरणे येथे 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. मुंबईकडून चाकणमार्गे येणाऱ्या अनुयायींची वाहने जुना मुंबई-पुणे हायवे रोडवरुन वडगाव मावळ, देहूरोड, निगडी, चऱ्होली, […]

1 min read

पब संस्कृतीला विरोध नाही, परंतु निर्बंध आवश्यक; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे वक्तव्य

पुणे: पुण्यातील पब संस्कृतीला पोलिसांचा विरोध नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. तथापि, नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी पबवर निर्बंध लावणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ते ‘कॉफी विथ सीपी’ या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने केले होते. आयुक्त […]

1 min read

चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले अन् पोलिसांसह सर्वांनीच लावला डोक्याला हात

पिंपरी : चादरीमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह मोकळ्या मैदानात पडलेला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळवले. गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चादर उलगडून त्यात गुंडाळलेला तो मृतदेह बाहेर काढला. मात्र त्या मृतदेहाकडे बघून पोलिसांनी डोक्यालाच हात लावून घेतला. चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह कोणत्याही मनुष्याचा नव्हताच. तो […]

1 min read