विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी

पुणे : (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी तसेच अन्य बाबीसाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश प्रा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

विजयस्तंभाजवळ वाहनांची मोठी गर्दी होऊ नये यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ६५ अन्वये प्रभारी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार मौजे वढू खुर्द ता. हवेली येथील गट क्र. १४४ मधील अनिल रामचंद्र चोंधे व इतर यांचे क्षेत्र ३.०३ हे. आर ‘शेतकरी मिसळ’ शेजारील जागा मिळकत अधिग्रहित करुन अनुयायांच्या वाहनांसाठी वाहनतळ म्हणून वापरण्यात येणार आहे.

Leave a Reply

rushi