मोटारीची काच फोडून साडे दहा लाखांची रोकड चोरली, विमाननगरमधील घटना

मागील काही दिवसांपासून गाडीची काच फोडून रोकड, लॅपटॉप यांसारखा ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर परिसरात दोन मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने पळवल्याची घटना ताजी असताना विमाननगर भागात अशीच एक घटना समोर आली आहे.

रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मोटारीची काच फोडून साडे दहा लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना विमाननगर परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शाह हे एक व्यावसायिक आहेत. मुंबई वरून कामानिमित्त शहरातील विमाननगर परिसरात ते आले होते. विमाननगर भागातील वाटिका सोसायटी समोर रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली कार रविवारी रात्री लावली होती. चोरट्यांनी गाडीची काच फोडून गाडीमध्ये ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन चोरटे पसार झाले. या पिशवीमध्ये दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड होती. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi