पुण्यातील रिक्षाचालकांसाठी बातमी; अलंकार पोलीस ठाण्यासमोरच्या ट्रॅकवरील रिक्षा मीटर तपासणी १ जानेवारीपासून बंद
पुणे : अलंकार पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ट्रॅकवर ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी येणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या अत्यल्प असल्यामुळे हा ट्रॅक १ जानेवारी २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार असून सर्व रिक्षा संघटना, रिक्षाचालक-मालक यांनी ऑटोरिक्षा मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलीब्रेशन) करावयाचे असल्यास आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे आपली वाहने सादर करावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केल आहे.