राहुल कलाटे सारखा उमदा नेता विधानसभेत गेल्यास शहराचाच नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास निश्चित : जयंत पाटील
चिंचवड, ता. १२ : राहुलदादा तडफदार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, बहिणींपासून युवकांपर्यंत सर्वांशी उत्तम संवाद ते साधू शकतात, सर्वसमावेशक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून हा उमदा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्यास केवळ चिंचवडचाच नाही तर संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून यावेळी राहुलदादांना विधानसभेत पाठवायचं ठरवलं आहे. असे प्रतिपादान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रहाटणी येथे केले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ युवक संवाद मेळाव्यात ते बोलत होते
माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, सविता दगडे, सुनिल गव्हाणे, तुषार कामठे, कैलास कदम, तुकाराम भोंडवे, इम्रान शेख, सागर तापकीर, दिनेश भोंडवे, ज्योती निंबाळकर, सचिन गायकवाड, अनिता तुतारे, वैशाली मराठे, देवेंद्र तायडे, अविनाश भालके, शिवाजी पाडुळे, मयूर जाधव, कौस्तुभ नवले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपने कर्तबगारीची तपासणी न करता घराणेशाहीला संधी दिली. त्यापेक्षा राहुलदादा किती तरी उजवे आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी राहुदादांशिवाय पर्याय नाही. पिंपरी चिंचवड शहरासारखा भ्रष्टाचार इतर कोणत्याही शहरात नाही. पिंपरी-चिंचवडचा पूर्वीचा नावलौकिक या सत्ताधाऱ्यांनी धुळीला मिळवला आहे. मनपा भ्रष्टाचारामुळे शहराची ओळख बदलली. टेंडर मॅनेज करणे, आमदार होणे म्हणजे मनपात वाटा मिळवणे अशी या सत्ताधाऱ्यांची समज झाली आहे. हे शहर म्हणजे पैसे खाण्याचे कुरण असे समजून शहरामध्ये अपप्रवृत्ती शिरल्या आहेत त्या अपप्रवृत्ती थांबवाव्या लागतील असेही आवाहन जयंत पाटील यांनी केले.
गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र गुजरातच्यामागे
महागाई, बेरोजगारी, टॅक्सरुपी पैशांची चोरी,
सर्वसामान्य जनतेवर घरपट्टी पासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा, श्रीमंतांना सूट पण गरिबांची कररुपी लूट, व्यापाऱ्यांना अटकेचा जाच, आजवरच्या इतिहासात रुपयाचे झालेले नीचांकी अवमूल्यांकन, हींजवडीतील आयटी कंपन्यानी घेतलेला काढता पाय या सर्व कारणांमुळे गेल्या दहा वर्षात आपण गुजरातच्या मागे पडलो. गुजरातमध्ये कंपन्यांचे स्थलांतर, देशावर २१० लाख कोटींचे कर्ज याबाबत त्यांनी केंद्र व राज्य सरकारला खडे बोल सुनावले.
चौकट :
शिवसेनेने पिंपरी चिंचवड मध्ये तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडले. त्यामुळे आम्ही शिवसेनेची काळजी घेऊ असे म्हणत काँग्रेस आमच्या रक्तात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व मित्र पक्षांची काळजी घेऊ असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
शरद पवारांनी आयटी पार्क आणले म्हणून शहराची भरभराट झाली. विशेष करून चिंचवडभाग सर्वाधिक समृद्ध झाला. याची परतफेड म्हणून तीनही मतदार संघात मतदार तुतारी वाजणार आहेत. राज्याची बिघडलेली घडी बसविण्यासाठी, महापालिकेतील भ्रष्टाचाराचा महापूर रोखण्यासाठी जनता महाविकास आघाडीला निवडणून देणार.
- विलास लांडे
माजी आमदार
एकाच कुटुंबाकडे सातत्याने सत्ता असूनही भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्न या पलीकडे चिंचवडला काही मिळालेलं नाही. त्यामुळे यावेळी जनता नक्की बदल घडवणार. –
राहूल कलाटे, उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष