सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतीगृहात गांजा; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी दोघा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या वसतीगृह परिसरात गांजा सापडल्याची घटना हाॅस्टेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

प्रकरणाचा तपशील
प्रा. संजयकुमार कांबळे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिसांनी प्रतीक गुजर (वय २०, रा. पिरंगुट) व आकाश ब्रम्हभट (वय २०, रा. बाणेर) यांच्यावर कारवाई केली आहे. तपासादरम्यान, आकाशच्या खिशातून १२ ग्रॅम गांजाची पुडी जप्त करण्यात आली.

कसे उघड झाले प्रकरण?
प्राध्यापक कांबळे हे २०२३ पासून वसतीगृहाचे रेक्टर म्हणून काम पाहत आहेत. बुधवारी सायंकाळी ५ वाजता एका फोन कॉलद्वारे रुम क्रमांक ८३ मधून गांजाचा वास येत असल्याची माहिती मिळाली. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने रुम तपासल्यावर दोघा विद्यार्थ्यांवर संशय बळावल्याने पोलिसांना बोलावले. झडतीदरम्यान गांजा जप्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील पावले
या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासन व पोलिसांनी वसतीगृहांमधील सुरक्षा व नियमांबाबत कठोरता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले करत आहेत.

Leave a Reply

rushi