महाकुंभमेळ्यात मोठी दुर्घटना: चेंगराचेंगरीत १० हून अधिक भाविकांचा मृत्यू, शाही स्नान रद्द

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठी दुर्घटना घडली असून, शाही स्नानासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० पेक्षा जास्त भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना त्रिवेणी संगमाजवळ रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, तातडीने मदतकार्य हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ तुम्ही आहात तिथेच शाही स्नान करा. संगम घाटाजवळ येण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचं पालन करा आणि व्यवस्था टिकवून ठेवण्याकरता सहकार्य करा. तसंच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

rushi