पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पुण्याची जबाबदारी अजित दादांकडे, माधुरी मिसाळ कोल्हापूरच्या सहपालकमंत्री

मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यसरकराने पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता.

पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांना मिळणार की चंद्रकात पाटील यांना, याबाबत उत्सुकता होती. यात पुन्हा एकदा अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सरशी साधल्याचे दिसून आले. यापूर्वी, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर चंद्रकात पाटील यांचे पुण्याचे पालकमंत्रिपद काढून ते अजित पवार यांना देण्यात आले होते.

भाजप आमदार तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपच्या आमदार तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leave a Reply

rushi