तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १२ गुन्हे उघडकीस; युनिट ६ ची कामगिरी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले असून, एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. डी.पी (विद्युत रोहित्र) मधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अबरार बिलाल अहमद (वय २४, रा. जमुनी, ता. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), आफताब नियामतउल्ला खान (वय ३२, रा. बोरीगाव, उरण, नवी मुंबई), नफीज हमीद अब्दुल (वय २३, रा. जमुनी, ता. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) आणि मोबीन हमीद अब्दुल (मुळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ९०० किलो तांब्याच्या तारांसह साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोणीकंद आणि वाघोली परिसरात डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडे सोपवली होती. तपासादरम्यान, पोलीस अंमलदार तनपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली. अधिक तपासात एकूण १२ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी १० लाख ४२ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०६चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे, पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.