कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे काम सुरू होणार; अवजड वाहनांना बंदी, कोणता रस्ता बंद, कोणता सुरू?

पुणे : कात्रज चौक येथील उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी दिनांक ३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जड-अवजड वाहने (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी ॲक्सल वाहने) या वाहनांना नमूद केलेल्या रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे .

१) साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुल येथे प्रवेश बंद राहील.

२) साताऱ्याकडून नविन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील.

३) मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील.

४) सोलापुरकडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणान्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील.

५) सासवडकडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील.

६) बोपदेव घाटकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशिन चौक पुढे प्रवेश बंद राहील.

७) मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील.

८) स्वारगेटकडून कात्रज मार्ग साताऱ्या कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.

तसेच मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १० ते ४ या दरम्यान प्रवेश चालु राहील परंतु त्यांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.

एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.

१) मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील.

२) साताऱ्याकडून स्वारगेट कडे येणाऱ्या एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांनी नवले पुलाखालुन उजवीकडे वळण घेवुन कात्रज येथुन स्वारगेट कडे जावे.

३) मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांनी स्वारगेट कडे जाण्यासाठी शक्यतो कात्रज चौका कडे न जाता इतर उपलब्ध पर्यायी मार्गाचा जास्तित जास्त वापर करावा.

अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

rushi