मुलीशी बोलतो या कारणावरून वडील आणि भावाने केला युवकाचा खून; वाघोलीतील धक्कादायक प्रकार

वाघोलीतील वाघेश्वरनगर भागात एका १७ वर्षाच्या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून युवकाला त्याच्या वडिल आणि भावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, नंतर लोखंडी रॉड आणि दगडाने डोक्यात मारून त्याचा जीव घेतला.

खून झालेल्या युवकाचे नाव गणेश वाघु धांडे (वय १७, गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) आहे. या प्रकरणात गणेश याचे वडील वाघु मारुती धांडे (वय ६४) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर (वय ३२), आणि लक्ष्मण पेटकर (वय ६०, सर्व गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयत गणेश आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरून गोरे वस्ती येथे येत होता. गणेश हा आरोपीच्या मुलीसोबत पूर्वी बोलायचा. याच गोष्टीचा राग मनात धरून तिघांनी गणेशला शिवीगाळ केली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात मारून त्याला ठार केले.

सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

rushi