मांज्याच्या बेछूट वापरामुळे माणसांबरोबर मुके प्राणीही धोक्यात, शुक्रवार पेठेत प्राणीमित्र भाजयुमो पदाधिकारी मनीषा धारणे यांनी पारव्याचे वाचवले प्राण

दि. १७ जानेवारी, पुणे: गेले अनेक दिवस, पतंगाच्या मांज्याच्या बेछूट वापरामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या बातम्या आपण अनेक ठिकाणी बघत आहोत. मात्र माणसांबरोबरच मुके प्राणी आणि पक्षी हे ही या मांज्याला बळी पडत असल्याचं दिसून येतंय. अशीच एक घटना पुण्यातील सुभाषनगर भागात घडली जेथे एका पारव्याचे प्राण दैव बलवत्तर असल्याने आणि प्राणिमित्रांच्या प्रयत्नांमुळे वाचले.

आज सकाळी, सुभाषनगर येथील एका छपराच्या आणि पन्हाळीच्या मध्ये एक पारवा अडकल्याचे भाजयुमो युवती प्रमुख मनीषाताई धारणे यांच्या लक्षात आले. पारवा अडकल्याचे आणि त्याची हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच मनीषाताईंनी मोठी शिडी उपलब्ध करून दिली. त्यानंतर येथील रहिवासी संजयजी नाईक आणि मनजी पाटीदार यांनी शिडीवर चढून तो पारवा खाली आणला. त्यावेळी पारव्याच्या दोन्ही पायांमध्ये मांजा गुंतलेला असल्याने पारव्याला उडता येत नसल्याचे लक्षात आले.

त्यानंतर मनीषाताईंनी हळुवारपणे पारव्याच्या पायातून मांजा सोडवून त्याला मोकळं केलं आणि पारवा मोकळेपणाने आकाशात भरारी घेऊ लागला.

यानिमित्ताने मनुष्यांना मदत उपलब्ध असली तरी दुर्दैवाने मुक्या पशुपक्ष्यांना वाचवायला मनीषा धारणे, संजय नाईक, मनजी पाटीदार व गौरव देशमुख यांच्यासारखे प्राणीमित्रच पुढे येणं गरजेचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

तसेच पतंगाच्या मांज्याच्या वापरावर कडक निर्बंध आणणं आणि विक्रीवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक झालेलं आहे हे प्रशासनाने समजून घेणं गरजेचं झालेलं आहे.

Leave a Reply

rushi