पीएमपी बसमध्ये मद्यपीने काढली महिलेची छेड, रणरागिनीने कॉलर धरली अन् धू-धू धुतला

पुणे: राज्यात अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पुण्यात घडलेल्या एका घटनेने महिलांनी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, हे सिद्ध केले आहे. एका मद्यपी व्यक्तीने बसमध्ये एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेने त्या मद्यपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना १८ डिसेंबर रोजी घडली.

शिर्डी येथील एका शाळेतील महिला क्रीडा शिक्षिका आपल्या पती आणि मुलासोबत पुणे येथून बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने त्यांची छेड काढली. मात्र, घाबरून न जाता त्यांनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर त्याला शनिवारवाड्याजवळील पोलीस चौकीत नेले. पण चौकीत पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले.

महिला शिक्षिकेने त्या व्यक्तीला चौकीत अर्धा तास बंद ठेवले. त्यानंतर माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. तथापि, या संपूर्ण प्रकरणात बसमधील महिलांपैकी एकही महिला मदतीसाठी पुढे आली नाही. तर त्याऐवजी दुसऱ्या बसमध्ये जावे असे ठरवले. यावर महिला शिक्षिकेने नाराजी व्यक्त केली.

महिला शिक्षिकेनेया घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “आधुनिक समाजात महिलांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी एकजुटीची गरज आहे. जर महिलांनी एकमेकांसोबत एकजुट होऊन आवाज उठवला, तर अशा घटनांना थांबवता येईल.”

Leave a Reply

rushi