…तोपर्यंत भारतामध्ये कॉन्सर्ट करणार नाही, दिलजीत दोसांझचा मोठा निर्णय; चाहते नाराज
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट्सने सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. भारतभर दिलजीतचे कॉन्सर्ट्स सुरू असताना. अशातच त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे, दिलजीत भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचं त्याने जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर दिलजीतचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दिलजीतने त्याचा निर्णय परत घ्यावा, अशी विनंती केली आहे.
पण, दिलजीतने हा निर्णय का घेतला, याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे. १४ डिसेंबरला चंदीगडमधील आपल्या लाईव्ह शोदरम्यान दिलजीतने हे जाहीर केलं की, “जोपर्यंत भारतात कॉन्सर्टसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा योग्य विकास होत नाही, तोपर्यंत मी भारतात एकही कॉन्सर्ट करणार नाही.”
त्याने पुढे सांगितलं, आपल्याकडे लाईव्ह शोसाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. लाईव्ह शो हे एक महत्त्वाचे महसूल साधन आहे आणि अनेक लोकांना यामुळे रोजगार मिळतो. भविष्यकाळात, मी स्टेजच्या मध्यभागी असण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून प्रेक्षक सगळ्या बाजूंनी माझ्या जवळ असतील. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही, असे दिलजीतने स्पष्ट केलं.
आता, भारतातील दिलजीतच्या चाहत्यांना त्याचे लाईव्ह कॉन्सर्ट अनुभवता येणार नाहीत, असं दिसत आहे.