चिंचवडकर जनता लुटीचा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार ! रोहित पवार स्थानिक नेत्यांसह महायुती सरकारवर रोहित पावरांचा हल्लाबोल
चिंचवड, ता. १० : चिंचवडमध्ये टँकरराज असून कॉन्ट्रॅक्टमध्ये टक्केवारी आणि मलिदा खाणारी गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट त्यांचीच कामे त्यांचीच रिंगही त्यांनीच करायची. ह्या लुटीला चिंचवडची जनता वैतागली असून चिंचवडची निवडणूक आता सर्व सामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे
चिंचवडकर मतदार यंदा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथील युवक मेळाव्यात ते बोलत होते. चिंचवडच्या स्थानिक नेत्यांवर हल्लाबोल करत त्यांनी युती सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. चिंचवडमध्ये काहींनी फक्त नातेवाईकांना व भाच्यांना पुढ करून लुटमार केली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ब्लु लाईनच घाणेरडे राजकारण करत मतदारांना वेठीस धरलं. राहुल यांची लढवय्या वृत्ती वाखण्याजोगी असून, त्यांच्याकडे जिगर आहे, हिम्मत आहे. त्यामुळे चिंचवड मतदार संघात लूटमारीचा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न फक्त तेच थांबवू शकतात. नगरसेवक असताना स्थायीत विरोध करून विकासकामे अडविण्यात आली. मात्र, शासनाकडून मंजुरी मिळवून हजारो कोटींची १९ प्रमुख डीपी रस्ते त्यांनी केली. मग आमदार झाल्यावर चिंचवडचा कायापालट होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल कलाटे भाषणासाठी उभे राहताच रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जोरदार घोषणांनी झाली. सत्ता नसतानाही सातत्याने शहरातील समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिलो. महाविकास आघाडीने विश्वास टाकला त्यांचे आभार. आमदार होताच अनधिकृत घरांची मालकी प्रत्येकाला देणे प्रमुख काम असेल. ‘भयमुक्त शहर, भ्रष्टाचार मुक्त कारभार’ हा प्रमुख अजेंडा आहे. गेल्या वीस वर्षात परिसरातील समस्या जैसे थे आहेत. आजवर केवळ आश्वासन देण्यात आली. आता लोकांना बदल हवा आहे. मतदार आता शहाणे झालेत. त्यामुळे वारं फिरलंय, यंदा इतिहास घडणार!, चिंचवडचे मतदार अनोखा चिंचवड पॅटर्न चालवणार!! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, मयूर कलाटे, विशाल वाकडकर, इम्रान शेख, युवासेना प्रमुख चेतन पवार,
अनिता तुतारे, वैशाली मराठे, ज्योती निंबाळकर, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, रविराज काळे, सागर तापकिर, कौस्तुभ नवले, सागर चिंचवडे, स्वप्निल बनसोडे, यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने चिंचवडमधील युवक उपस्थित होते.
चौकट : फडणवीस सारखा खोटारडा माणूस नाही
२० वर्ष सत्ता असताना कोणतेही आश्वासन पूर्ण केली नाही. प्रत्येक निवडणूकीला पुन्हा तीच तीच आश्वासन देतात असं म्हणून, मूलभूत समस्यांमुळे येथील नागरिक वैतागले आहेत. भाजपा मतदारांची दिशाभूल करत असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, राज्यात महविकास सरकार येणार हे नक्की असून, त्यासाठी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे. पुढील काही दिवस सर्वांनी जागृत राहण्याचे आवाहन युवाकांना केले.
चौकट
दोन्ही आमदारांनी परिसर वाटून घेतला : तुषार कामठे
महापालिकेच्या आठ हजार कोटींच्या अर्थ संकल्पाची विभागणी दोन आमदारांनी केली. रस्त्याच्या पलीकडे आणि अलीकडे असा परिसर त्यांनी वाटून घेतला होता. प्रत्यक्षात मात्र विकासकामे शून्य आहेत. पाण्यासाठी वणवण आहे, टॅंकर माफियांचा सुळसुळाट झाला आहे. उमेदवारांचे सर्व भाचे गब्बर ठेकेदार झालेत. ज्याच्या जमिनी त्याला तिकीट असे यांचे धोरण आहे. गेल्या वीस वर्षात आमदारांनी किती निधी आणला आणि खर्च केला ते आधी दाखवावे. नगरसेवकांनी केलेली कामे आमदार निधीतून केल्याच भासवून जनतेची दिशाभूल सुरु आहे.