सीएनजीच्या दरात १.१० रुपयांची वाढ, पुणेकरांच्या खिशाला कात्री

पुणे: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.१० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार असून महागाईच्या वाढत्या झळा सोसाव्या लागत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलो १.१० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. नवीन शनिवार मध्यरात्रीपासून हे दर लागू […]

1 min read

सरत्या वर्षात ५,२५६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई, ३१ डिसेंबरलाही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात विशेष मोहीम

पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. डिस्पोजेबल पाइपसह ब्रेथ ॲनलायझरच्या मदतीने मद्यपान केलेल्या वाहनचालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २०२४ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात वाहतूक शाखेकडून ३० हून अधिक ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात विशेष मोहीम […]

1 min read

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवले; एकाचा मृत्यू

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक मजुर ठार झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात पोईसर मेट्रो स्थानकाजवळ आज (दि. 28) एक भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत असताना तिच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. अधिक वेगामुळे कार रस्त्याच्या कडेला […]

1 min read

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदान

छत्रपती संभाजीनगर (दि.२८ डिसेंबर): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून १५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, […]

1 min read

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी

पुणे : (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी तसेच अन्य बाबीसाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश प्रा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. विजयस्तंभाजवळ वाहनांची मोठी […]

1 min read

थेऊर येथील गोळीबार प्रकरणी एकूण ०३ जण ताब्यात; गुन्हे शाखा यूनिट ६ ची कामगिरी

किरकोळ वादातून पुण्याच्या लोणी काळभोर भागामध्ये हवेत गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपिंनी घटनास्थळावरून थेऊर बाजूकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. लघुशंका करताना हटकल्याने मारहाण करत हवेत गोळीबार केला गेला. या मारहाणीमध्ये फिर्यादी अक्षय साहेबराव चव्हाण यांची पत्नी शीतल अक्षय चव्हाण वय ३२ रा थेऊर जय मल्हार प्लॉटिंग जवळ ता हवेली जि पुणे या गंभीर […]

1 min read

पुण्यातील रिक्षाचालकांसाठी बातमी; अलंकार पोलीस ठाण्यासमोरच्या ट्रॅकवरील रिक्षा मीटर तपासणी १ जानेवारीपासून बंद

पुणे : अलंकार पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ट्रॅकवर ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी येणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या अत्यल्प असल्यामुळे हा ट्रॅक १ जानेवारी २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार असून सर्व रिक्षा संघटना, रिक्षाचालक-मालक यांनी ऑटोरिक्षा मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलीब्रेशन) […]

1 min read

सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ हिला पोलीस कोठडी

सतीश वाघ हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ हिनेच पतीच्या कुणाचा कट रचल्याचे तपासात समोर आले होते. बुधवारी मोहिनी वाघ हिला पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी मोहिनी हिला 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अनैतिक संबंधासह पतीचे संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच हाती असावे […]

1 min read

पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणारा एसीबीच्या जाळ्यात

पुणे: सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दोन हजार रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसनअली गुलाब बारटक्के (वय, ४५, रा. ताडीवाला रोड) असे आरोपीचे नाव आहे. साहेब पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे […]

1 min read

तीस वर्षीय तरूणाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : 30 वर्षीय तरुणाने इंद्रायणी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना देहूगाव येथे घडली आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार समोर आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकुश गजानन काळोखे (वय 30, रा. देहूगाव, विठ्ठलवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. अंकुशच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. […]

1 min read