तरुणीवर मित्राने केला धारदार शस्त्राने हल्ला, WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये घडली घटना

पुणे : येरवडा पोलिस स्टेशन हद्दीतील WNS कंपनी, रामवाडी येरवडा येथील पार्किंगमध्ये आज सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. याच कंपनीत काम करणारी शुभदा शंकर कोदारे (वय २८) हिला तिच्या मित्राने धारदार हत्याराने गंभीर जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा हिचे आणि कृष्णा सत्यनारायण कनोजा यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाच्या परिणामी कृष्णाने […]

1 min read

पुण्यात कोयत्याची दहशत सुरुच; दोघांवर हल्ला, हाताचा पंजा तुटला

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोयत्याची दहशत दाखवून धाक दाखवणे, कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. अशीच एक घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. दोन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना परिसरात सोमवारी दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. […]

1 min read

एचएमपीव्हीची (HMPV) भारतात एंट्री; संक्रमण टाळण्यासाठी ‘या’ सूचनांचे करा पालन

चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता. कोरोनानंतर जग पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर असल्याची चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले होते. त्यानंतर आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस (HMPV)ची अनेक लोकांना लागण झाली आहे. या व्हायरसने इतर देशातही आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतात […]

1 min read

पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांची दहशत, पैसे देण्यास नकार दिल्याने केला ब्लेडने वार

पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चक्क ब्लेडने वार केल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. वडिथा गोविंदा नाईक (वय २८, रा. बिबवेवाडी) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी वडिथा नाईक […]

1 min read

१० व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश, जगभरातील ६५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर (दि.०५): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. १५ ते रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा […]

1 min read

दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ

एका दुचाकीस्वार महिलेने महिला पोलीसाला धक्काबुकी करत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील वारजे परिसरात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वारजे परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलीस […]

1 min read

थेऊर गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सापळा रचून घेतले ताब्यात

थेऊर गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या युनिट सहाने सापळा रचत खेड-शिवापूर येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. थेऊर रस्ता येथे 27 डिसेंबरला सहा ते सात व्यक्तींनी एका महिलेच्या डोक्यात दगड मारून , तिच्या पतीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली होती होती. दगड मारल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा […]

1 min read

खंडणीच्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीला अटक

पुणे : अत्याचार करून खंडणी मागण्याच्या प्रकरणातील पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मानस उर्फ शुभांशु उपेंद्र शर्मा (वय-२४, रा. अप्पर इंदिरा नगर, बसडेपो जवळ, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक […]

1 min read

दारू पिण्यास पैसे न दिल्याने लोणी काळभोर येथे एकाचा खून

दारू पिण्यास पैसे न दिल्याने लोणी काळभोर येथे एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे .(वय ३९, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे […]

1 min read

संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांची मोठी कारवाई, फरार आरोपींना ठोकल्या बेड्या, पुण्यातून घेतले ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार असलेल्या तीन आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. तथापि तिसरा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर […]

1 min read