मांज्याच्या बेछूट वापरामुळे माणसांबरोबर मुके प्राणीही धोक्यात, शुक्रवार पेठेत प्राणीमित्र भाजयुमो पदाधिकारी मनीषा धारणे यांनी पारव्याचे वाचवले प्राण

दि. १७ जानेवारी, पुणे: गेले अनेक दिवस, पतंगाच्या मांज्याच्या बेछूट वापरामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या बातम्या आपण अनेक ठिकाणी बघत आहोत. मात्र माणसांबरोबरच मुके प्राणी आणि पक्षी हे ही या मांज्याला बळी पडत असल्याचं दिसून येतंय. अशीच एक घटना पुण्यातील सुभाषनगर भागात घडली जेथे एका पारव्याचे प्राण दैव बलवत्तर असल्याने आणि प्राणिमित्रांच्या प्रयत्नांमुळे वाचले. आज […]

1 min read

पुणे : मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १५ लाखांचे एमडी जप्त

मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण १५ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ७७ ग्रॅम मेफेड्रॉनचा देखील समावेश आहे. हुसेन नुर खान (वय २१, कोंढवा, पुणे) आणि फैजान अयाज शेख (वय […]

1 min read

पोटच्या मुलीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईला जन्मठेपेची शिक्षा

पतीशी सुरू असलेल्या वादातून एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वारजे परिसरात घडली होती. पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या या आईला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेप तसेच १० हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. अनिता संजय साळवे (वय २५, रा. वारजे) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. सविस्तर घटना […]

1 min read

महर्षीनगर परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : महर्षीनगर भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडून स्वारगेट पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले असून त्याने ही बनावट कागदपत्रे कशी तयार केली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. बांगलादेशी नागरिक मागील दहा वर्षांपासून पुण्यात बेकायदा वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकच […]

1 min read

भारतीय सिनेमांना जगभरात उत्तम प्रतिसाद…: केंद्रीय सचिव संजय जाजू जाजू यांची अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम चित्रपटाला प्रोत्साहन दिलेले असून सिनेमा हा ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज आपले सिनेमे जगभर जात असून जगभरातील प्रेक्षक त्यांना आनंदाने पाहत उत्तम प्रतिसाद देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी येथे केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या […]

1 min read

बनावट नोटांच्या रॅकेटचा भंडाफोड; पाच जण अटकेत, १० लाखांच्या नकली नोटा जप्त

पुणे: सहकारनगर पोलिसांनी बनावट चलनी नोटांचे रॅकेट उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या ५०० रुपयांच्या २,०७० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निलेश हिरानंद विरकर (वय ३३, रा. चिंचवड), सैफान कैयुम पटेल (वय […]

1 min read

येनपूरे टोळीच्या म्होरक्या पप्पू येनपूरेला बारामतीमधून अटक, पोलिसांना चकवत दोन वर्षे होता फरार

पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीमधून अटक केली आहे. प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर येनपूरे तब्बल दोन वर्षे पोलिसांना चकवा देत फरार होता. कात्रज आणि आंबेगाव भागात […]

1 min read

डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी करणारा चोरटा साथीदारांसह गजाआड; सोने, हिऱ्यांसह पिस्तूल जप्त

पुणे : डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान करून घरफोड्या करणाऱ्या एका टोळीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ८० लाख रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड) याच्यासह सुरेश बबन पवार (वय ३५, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे) आणि सराफ व्यवसायिक भीमसिंग उर्फ अजय करणसिंह राजपूत (वय ३९) […]

1 min read

Pune Police Inspector Transfers : पुणे शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

पुणे: पुणे शहर पोलीस दलात २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहतूक, गुन्हे शाखा, आणि विशेष शाखेतील निरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यात कार्यरत वरिष्ठ निरीक्षकांना विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेत नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासकीय गरजांमुळे या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार […]

1 min read

मध्यरात्री घरात घुसलेल्याने अभिनेता सैफ अली खानवर केला चाकूने हल्ला, अभिनेता रुग्णालयात दाखल

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास अज्ञात चोर घुसला. चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोर घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात वाद झाला. या वादात चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. […]

1 min read