खरा शिवसैनिक ठाकरेंसोबतच, महाविकास आघाडीधर्म पाळणार – खासदार संजय राऊत चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार – खासदार संजय राऊत — महाविकास आघाडीचे सरकार येणार. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच ! महाविकास आघाडीला १६०ते १६५ जागांवर विजय मिळेल.
चिंचवड, ता. १५ : अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा निष्ठावंत, सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्येही सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस […]