ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची २७ लाखांची फसवणूक
पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वाघोली येथील एका तरुणाची तब्बल २७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काम करून चांगले पैसे मिळवण्याचे आश्वासन देत, चोरट्यांनी या तरुणाला फसवले. केसनंद परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी, चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर […]