पुणे रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी, एकजण अटकेत

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. त्यामुळे एकच खळबळ माजली. धमकी देणारा व्यक्तीने दारूच्या नशेत फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. सागर भंडारी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किवळे येथील रहिवासी आहे. रावेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल […]

1 min read

बोपोडीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला; एकाला अटक

पुणे : मागील काही काळापासून शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बोपोडीमधील भाऊ पाटील रस्त्यावर घडली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहे. खडकी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संदीप सुनील कवाळे (वय २७, रा. डॉ. आंबेडकर चौक, औंध रस्ता) असे […]

1 min read

पीएमपीचा तिकीटदर वाढवण्याचा प्रस्ताव; सर्वसामान्यांचा प्रवास महागणार

पुणे: पीएमपीएमएलचा (पुणे महानगर परिवहन महामंडळ) तोटा ७५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कर्मचार्‍यांच्या कायमस्वरूपी सेवेमुळे वेतनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आर्थिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी तिकीट दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे तिकीट दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. पीएमपीला पुणे शहरची जीवनवाहिनी मानली जाते. मागील अनेक […]

1 min read

गावठी हातभट्टी दारू तयार करणारे दोघे गजाआड; वडाची वाडी परिसरात छापा

पुणे: कात्रज-कोंढवा बाह्यवळण रस्त्यावरील वडाची वाडी परिसरात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. काळेपडळ पोलिसांच्या पथकाने या कारवाईत १२ हजार लिटर कच्चे रसायन आणि चार हजार लिटर तयार गावठी दारू असा एकूण ९ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या […]

1 min read

पीएमपी बसमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य, तरूणावर गुन्हा दाखल

प्रवासी तरुणीशी पीएमपी बस मध्ये तरुणाने अश्लील कृत्य केल्याची घटना शंकरशेठ रस्ता परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणीने खडक पोलीस ठण्यात फिर्याद दिली असून एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुधीर खाटमोडे (वय ३४, रा. नारायण पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत […]

1 min read

पुण्यातील संतापजनक प्रकार! अल्पवयीन मुलीला गच्चीवर घेऊन गेला अन्…

पुणे : शिकवणीसाठी आलेल्या आठ वर्षीय शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. याप्रकरी पिडित मुलीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखले केली. या तक्रारीवरून पोलीसांनी १४ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला […]

1 min read

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणालीद्वारे वाहनावर नजर

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रीम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गावर […]

1 min read

सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूटने थकवला तब्बल ४७ कोटीहून अधिक मिळकत कर; पुणे महापालिकेकडून जप्तीची कारवाई

पुणे : महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने थकबाकीदारांवर कारवाई बडगा उगारला असून बड्या थकबाकीदारांच्या दारात थेट बॅंड बाजा वाजविला जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पहायला मिळत असून कोट्यवधी रुपयांच्या कराची वसूली होऊ लागली आहे. मिळकत कर न भरणाऱ्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. मिळकत विभागाच्या पथकाने अशाच पद्धतीने एरंडवणे येथील सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूटची […]

1 min read

राष्ट्रवादी गटात प्रवेश केल्यामुळे हल्ला झाल्याचा टिंगरे कुटुंबीयांचा आरोप; दोघे अटकेत

पुणे : विश्रांतवाडी परिसरात माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रेवण तानाजी लगस (वय २०, रा. गोकुळ नगर, […]

1 min read

पवनानगर बोट दुर्घटना : बंगला मालक तसेच बोट मालकांवर गुन्हा दाखल

मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये बुधवारी सायंकाळी बोट उलटून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकाविरोधात निष्काळजीपणाचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत तुषार अहिरे यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले. मूळचे भुसावळचे […]

1 min read