विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने आणि विविध संघटनांच्या सहकार्याने यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांना पुरविण्यात येतील, असे ते म्हणाले. […]