पुणे : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी

पुणे: पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 1 जानेवारी 2025 रोजी मोठया प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. विजयस्तंभास अभिवादन […]

1 min read

मोक्यातील फरारी आरोपीच्या बंडगार्डन पोलिसांची आवळल्या मुसक्या, कर्नाटकातून घेतले ताब्यात

मागील सहा महिन्यांपासून मोक्यातील फरारी आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटक राज्यातील रायचूर येथून ताब्यात घेतले. सौरभ तिमप्पा धनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. गणेश संजय पोळ (वय, २९, रा. ताडीवालारोड, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी गणेश पोळ हे […]

1 min read

सतीश वाघ यांच्या हत्येमागील गूढ उलगडलं: शेजाऱ्यानेच पाच लाखांची सुपारी देऊन घडवली हत्या

हडपसर परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैयक्तिक वादातून शेजाऱ्याने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. सोमवारी (९ […]

1 min read

अकोले पोलिसांची असंवेदनशीलता: एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले, ‘हिट अँण्ड रन’ मधील आरोपी अद्यापही मोकाट

अकोले येथे मतदान करून घरी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांना एका पिकअप वाहनाने चिरडले. ‘हिट अँड रन’चा हा भयानक प्रकार २० नोव्हेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण या गावाजवळ घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. परंतु आकोले पोलिसांनी मात्र हे प्रकरण हाताळताना अतिशय असंवेदनशीलता दाखवली. पोलिसांनी अद्यापही आरोपीस अटक केलेली नसून गुन्हा दाखल करताना […]

1 min read

नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधल्या प्लास्टीक पिशव्या

पुणे : नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक येथील रेणुका नगरी परिसरात घडली आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी बाळाचा जीव वाचवला. नवजात बाळाला असे रस्त्यावर टाकून दिल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवजात बाळाच्या […]

1 min read

‘वेंकीज’च्या संचालकांच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, आयोजकांवर गुन्हा दाखल

पुणे : वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या आवाजात लाउडस्पीकर व एलईडी लाईट लावून सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी बावधन पोलीसांनी आयोजकांवर कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी या संदर्भात माहिती दिली. या प्रकरणी आयोजक आदिनाथ संभाजी मते (रा. वेंकटेश्वरा हाउस, पुणे) यांच्याविरोधात रतीय न्याय संहितेचे कलम २९२, […]

1 min read

पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला मारहाण

पिंपरी-चिंचवड:मध्यस्थी करणाऱ्या महिलेस आणि प्रेयसीला प्रियकराच्या कुटुंबीयाकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला. या घटनेनंतर प्रेयसी गावी निघून गेली. याप्रकरणी पत्नी, आकाश तावडे यांच्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आणि शेजारणीला मारहाण करणाऱ्या महिलेच्या पतीचे प्रेमप्रकरण सुरू […]

1 min read

नारायण पेठ पोलीस चौकीजवळच ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावला

केळकर रस्त्यावरील नारायणपेठ पोलीस चौकीजवळ एका पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल चोरट्याने हिसकावून नेण्याची घटना घडली आहे. थेट पोलीस चौकीच्या जवळच हा प्रकार घडल्याने सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक नारायण पेठेतील एका […]

1 min read

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की, धनखड हे पक्षपातीपणे सभागृहाचे कामकाज चालवत आहेत आणि विरोधी पक्षातील सदस्यांना मते मांडण्यासाठी संधी दिली जात नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत ‘एक्स’च्या माध्यमातून माहिती दिली आहे. मंगळवारी इंडिया आघाडीतील काँग्रेस, तृणमूल […]

1 min read

मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले, बंडगार्डन परिसरातील घटना

नाकाबंदी दरम्यान महिला पोलीस हवालदाराला मोटारचालकाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील बंडगार्डन रस्ता परिसरात मध्यरात्री हा प्रकार घडला. महिला पोलीस हवालदाराला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपमाला राजू नायर असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विजयकुमार जगताप यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. […]

1 min read