खून, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला रेकॉर्डवरील सराईत ताब्यात
पुणे आणि सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने खेड शिवापूर येथून सापळा रचून खून, खूनाचा प्रयत्न आणि अन्य गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या विशाल सज्जन फाळके (वय ३२ वर्ष, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द, पुणे) याला अटक केली. आरोपीला सांगली पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आले आहे. विशाल फाळके हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली, तासगाव, सिंहगड रोड, […]