बनाना लिफ कल्याणी नगर येथे हॉटेलमध्ये चोरी करणारा जेरबंद

पुणे – बनाना लिफ, कल्याणी नगर येथील हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला युनिट-४ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सौरभ शिवाजी साबळे (वय २६ वर्षे, रा. वैष्णवी सिटी, देवाची उरुळी, आदर्श नगर, हडपसर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस हवालदार हरीश मोरे आणि विशाल गाडे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी […]

1 min read

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचार्कीसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. […]

1 min read

चिमुकल्याचा वाढदिवस आणि आग; अग्निशमन दलाकडून पाच महिला व चिमुकल्याची सुटका

पुणे : कोंढव्यात दुकानाला आग घटना आज १७ डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास घडली. याबाबत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथे दुकानामध्ये आग लागल्याची वर्दि मिळताच तातडीने कोंढवा खुर्द व बुद्रुक येथून दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. सदर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, जुन्या तीन मजली […]

1 min read

पुणे पुस्तक महोत्सवात उलगडली रिक्षात विसरलेल्या ‘अनमोल ठेवा’ची गोष्ट

अनेक वेळा रिक्षाचालकांच्या चांगुलपणाचा अनुभव लोकांना येत असतो. असाच अनुभव पुणे पुस्तक महोत्सवादरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाला आला आहे. पुणे पुस्तक महोत्सवातून एक ज्येष्ठ नागरिक रिक्षातून घरी परतले. आयुष्यभराचा ‘अनमोल ठेवा’ असलेली त्यांची पिशवी रिक्षात विसरून राहिली. काही वेळाने रिक्षाचालकाने त्यांना फोन केला. त्यांची पिशवी रिक्षात विसरून राहिली असल्याचे चालकाने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. पिशवीत जाहिरातीसारखे पत्र […]

1 min read

जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; भुजबळ यांचे सूचक वक्तव्य

महायुती सरकारचा विस्तार नुकताच पार पडला. मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे. भुजबळ यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न […]

1 min read

…तोपर्यंत भारतामध्ये कॉन्सर्ट करणार नाही, दिलजीत दोसांझचा मोठा निर्णय; चाहते नाराज

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट्सने सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. भारतभर दिलजीतचे कॉन्सर्ट्स सुरू असताना. अशातच त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे, दिलजीत भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचं त्याने जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर दिलजीतचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे […]

1 min read

पिस्तूल बाळगणारे दोन सराईत अटकेत, सिंहगड रस्ता पोलिसांची धायरी परिसरात कारवाई

सिंहगड रस्ता पोलिसांनी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली. या दोघांकडून दोन पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त करण्यात माहिती समोर आली आहे. या दोघांवर याआधी गंभीर गुन्हे दाखल आहेत. साजन विनोद शहा (वय १९), कुणाल शिवाजी पुरी (वय १८, दोघे रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या संदर्भात पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला यांनी सिंहगड रस्ता […]

1 min read

घरात घुसून दहशत माजवणारा आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

पुणे : पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट ६ ने मोठी कारवाई करत दहशत माजवणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केले आहे. १४ डिसेंबर रोजी युनिट ६ च्या पोलिस पथकाला गस्त घालताना माहिती मिळाली की, बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय महादेव बनसोडे (वय २६, रा. संतोष मित्र मंडळ, लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे) वाघोली येथील बेफ […]

1 min read

पुणे गारठले; हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद

पुणे शहरातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळीनंतर थंडीचा प्रभाव वाढला आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सतत घट होत आहे. त्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी, जसे की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि शिवाजीनगर येथे किमान तापमान एक अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले. पुण्यात ८ ते ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, आणि दिवसा गारवा जाणवू लागला […]

1 min read

डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; नगर रस्त्यावर घडली घटना

नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय ५८, रा. उबाळेनगर, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सरडे यांचा मुलगा समाधान (वय २०) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी डंपर चालक राजू पांडू चव्हाण (वय […]

1 min read