हातात बांबू आणि दगडं! पुण्यात ३ तरुणांकडून वाहनांची, दुकानाची तोडफोड
पुणे : पुणे शहरातील लोहगाव परिसरात तीन तरुणांनी वाहनांची, दुकाने आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना लोहगाव येथील साठे वस्ती परिसरातील आहे. यामध्ये तीन तरुण बांबू आणि दगडांनी वाहने आणि दुकाने फोडत आहेत. तसेच, दुचाकींच्या काचांची तोडफोड करत असताना त्यांची दहशत परिसरात पसरली. या तोडफोडीत ५-६ दुचाकींचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तपास करत आहे.