पुढील ६ महिन्यांत पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार; नितीन गडकरींची माहिती
देशातील मोटार उत्पादक कंपन्यांकडून पुढील सहा महिन्यांत शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणारी मोटारी सादर केली जाणार आहे. त्यासोबतच बायोइथेनॉलवरील दुचाकीही लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे लवकरच शंभर टक्के बायोइथेनॉलवरील वाहने धावताना दिसणार आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले […]