खून, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला रेकॉर्डवरील सराईत ताब्यात

पुणे आणि सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने खेड शिवापूर येथून सापळा रचून खून, खूनाचा प्रयत्न आणि अन्य गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या विशाल सज्जन फाळके (वय ३२ वर्ष, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द, पुणे) याला अटक केली. आरोपीला सांगली पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आले आहे.

विशाल फाळके हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली, तासगाव, सिंहगड रोड, वारजे, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र अधिनियमाअन्वये एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सांगली पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील तासगाव येथे दाखल झालेल्या खून आणि खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी फाळके याचा शोध गुन्हे शाखेचे युनिट २ व सांगली एल.सी.बी. पथकाने सुरू केला.

पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी खेड शिवापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सांगली एल.सी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने, तसेच गुन्हे शाखेचे युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे आणि निखिल जाधव यांचे पथकाने खेड शिवापूर येथे सापळा रचला. १३ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी विशाल फाळके याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मागदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस हवालदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, निखिल जाधव, विजय पवार, नागनाथ राख, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, अमोल सरडे, संजय आबनावे, प्रमोद कोकणे, व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली

Leave a Reply

rushi