अपघातानंतर तरुण फिट येवून पडला, पोलीस उपायुक्तांनी वाचविले प्राण
पुणे : वानवडी येथील जगताप चौकात एक धक्कादायक अपघात घडला. एका कारने दुचाकीस्वाराला उडवले. या अपघातानंतर दुचाकीस्वार फिट येवून रस्त्यावर पडला होता. त्याची स्थिती बघून आसपासचे लोक घाबरले होते.
अशा स्थितीत, त्याच रस्त्यावरून जात असलेले पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तरुणाला प्राथमिक उपचार दिले. डॉ. भाजीभाकरे यांनी आपली वैद्यकीय कलेचा उपयोग करून या तरुणाचे प्राण वाचवले.
या घटनेमुळे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांचे कौतुक केले जात आहे.
पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे हे पुणे शहर पोलीस दलात पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत.