मध्यरात्री घरात घुसलेल्याने अभिनेता सैफ अली खानवर केला चाकूने हल्ला, अभिनेता रुग्णालयात दाखल

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास अज्ञात चोर घुसला. चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चोर घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात वाद झाला. या वादात चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात सैफ अली खानला सहा ठिकाणी जखमा झाल्या असून, त्यापैकी दोन जखमा खोल असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. साडेतीनच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले जाते.

या घटनेत चोराने आधी सैफच्या मोलकरणीसोबत वाद घातला होता. सैफ याने हस्तक्षेप करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चोराने सैफवर हल्ला केला.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे सैफ अली खानच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

rushi